स्टील कंपन्यांवरच्या धाडीत साठ कोटी जप्त
जालना, दि. 08, नोव्हेंबर - जालन्यात दोन स्टील कंपन्यांवर आयकर विभागाने धाडी मारल्या असून तब्बल साठ कोटी रूपये जप्त केले आहेत नाशिक औरंगाबाद येथील दोनशे अधिका-यांनी मिळून एकदाच ही कारवाई दोन स्टील कारखानदारांवर केली. नोटाबंदीनंतरही कर बुडवून हा पैसा साठविला गेला होता. या स्टील कंपन्यांचे व्यवहार संशयास्पद होते. एकाच वेळी या पथकाने या व्यापा-यांच्या कंपनी आणि घरांवर छापे मारले. या मालकांच्या इतर शहरांतील नातेवाईकांच्या संपत्तीचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.