नाकाबंदीत जीपमध्ये सापडले तीस लाख रूपये
जालना, दि. 08, नोव्हेंबर - नाकाबंदी दरम्यान जालना येथे एका जीपमधून नेण्यात येणारी 30 लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार जालना येथे एका जीपमधुन बेहिशोबी पैसे नेले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेने शहरात सर्वत्र नाकाबंदी केली होती. दरम्यान 6 नोव्हेंबर रोजी रात्री या पथकाला तपासणीदरम्यान एका जीपमध्ये 30 लाख 40 हजार रुपयांची रोकड आढळली. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली असून याप्रकरणी दोघांंना ताब्यात घेतले आहे.