Breaking News

भारतातील मुलांना मिळणार कॅटलोनीआच्या मैदानावर फुटबॉल खेळण्याची संधी

पुणे, दि. 02, नोव्हेंबर - पुण्यातील तृणा इंडियाच्या पुढाकाराने लवकरच पुण्यासह इतर राज्यांतील फुटबॉल प्रेमी मुलामुलींना स्पेनमधील कॅटलोनीआच्या फुटबॉल मैदानावर  खेळण्याची संधी मिळणार आहे. यासाठी 10, 12, 14 आणि 16 हा वयोगट निश्‍चित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांतील मुले आणि मुली या प्रकल्पामार्फत स्पेनला जाऊ शकतील. विशेष म्हणजे या मुलांना, ज्यांनी अनेक प्रसिद्ध फु टबॉल खेळाडूंना घडवले त्या फुटबॉल प्रशिक्षक अल्बर्ट विनस यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
पुण्यातील तृणा इंडियाचे जिग्नेश कारीया यांची ही संकल्पना आहे. ते बांधकाम व्यवसायात असून, लहानपणापासूनचे फुटबॉल खेळावरील प्रेम त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. ते स्वतः  उत्तम खेळाडू आहेत. स्पेनमधील त्यांचे स्नेही क्रिशन लल्ला यांच्याशी फुटबॉल खेळाविषयी बोलत असताना त्यांच्या मनात ही संकल्पना आली. लल्ला आणि ऑस्कर लेडेस्मा यांची  पोडिग्री एक्सपीरियेन्स ही संस्था स्पेनमध्ये फुटबॉल खेळाविषयात आधीच कार्यरत होती. या संस्थेशी संलग्न होऊन स्पेन/कॅटलोनीआतील स्मार्ट फुटबॉल व टेक्नीफुटबॉलच्या  अल्बर्ट विनस यांच्याबरोबर भरतातील मुलांसाठी एक क्रीडा प्रकल्प करण्याची इच्छा कारीया यांनी बोलून दाखवली. एवढेच नाही, तर ती प्रत्यक्षात उतरण्याची चिन्हे दिसताच त्यांनी  स्वतः स्पेनला जाऊन, तेथे मुलांसाठी कशा प्रकारचे क्रीडा विषयीचे आभ्यासक्रम असतात, तसेच बाहेरील देशातून आलेल्या मुलांची व्यवस्था, त्यांची सुरक्षा आणि आरोग्य तसेच  त्यांना दिले जाणारे अन्न या सर्व बाबीं जाणून घेतल्या.
आपल्या संकल्पनेचा फायदा आपल्या देशातील मुलांना निश्‍चित होणार, याची खात्री पटल्यावर कारीया यांनी पोडिग्री एक्सपीरियेन्सबरोबर संलग्न होऊन स्मार्ट फुटबॉलबरोबर पाच  वर्षांचा करार केला आणि या प्रकल्पाची घोषणा भारतात करण्याचा निर्णय घेतला. आज पुण्यात फुटबॉल प्रशिक्षक अल्बर्ट विनस यांच्यासह पोडिग्री एक्सपीरियेन्स क्रिशन लल्ला आणि  ऑस्कर लेडेस्मा यांनी तृणा इंडिया बरोबरच्या या प्रकल्पाची घोषणा केली. कार्यक्रमाच्या सुरवातीला जिग्नेश कारीया यांनी आपली संकल्पना स्पष्ट केली.
या प्रकल्पामध्ये अल्बर्ट विनस यांनी स्वतः विकसित केलेली ‘फुटबॉल अ कॅटलन वे’ ही मेथड वापरून मुलांसाठी कार्यशाळा घेतात. यामध्ये स्पेनमधील फुटबॉलच्या विविध प्रक ारच्या (ग्रास, आर्टीफीशीअल, हायब्रीड) मैदानांवर खेळण्याची संधी तसेच स्मार्ट फुटबॉल म्हणजे नेमके काय ? खेळाडुंची मानसिक व शारीरिक तयारी, व्यक्तिमत्व विकास तसेच  हौशी आणि व्यवसायिक क्रीडापटू होण्यासाठीची सर्व तयारी करून घेतली जाते. या कार्यशाळा मुलांसाठी निश्‍चितच फायदेशीर ठरतात.