Breaking News

प्रलंबित मागण्यांसाठी बार्शीत खत, बियाणे, औषध विक्रेत्यांचा बंद

सोलापूर, दि. 02, नोव्हेंबर - प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी 2 ते 4 नोव्हेंबर या कालावधीत बंद पुकारला आहे. संघटनेने तहसीलदार ऋ षीकेत शेळके यांना निवेदन दिले आहे. यवतमाळ जिल्ह्यात पिकावर चुकीच्या पद्धतीने कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विषबाधा झाल्याने शेतकरी, शेतमजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाले.  घटना दुर्दैवी आहे. परंतु यास जबाबदार धरून कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करणे, विक्री परवाना रद्द करणे, विक्री बंद आदेश देणे अशा प्रकारची गंभीर कारवाई होत आहे.  त्यामुळे हा व्यवसाय करणे कठीण झाले आहे. त्यामुळे संघटनेने बंद पुकारल्याचे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, ऑक्टोबर छाटणीनंतर द्राक्षवेलीच्या काड्यांना पेस्ट लावणे, ख रिपातील तुरीसाठी खते, कीटकनाशक, रब्बीसाठी बियाणांची खरेदीसाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू आहे. अशा परिस्थितीत औषधे, खते बियाणे विक्रेत्यांच्या तीन दिवसांच्या बंदमुळे  त्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
कृषीनिविष्ठा विक्रेत्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. निलंबित केलेले विक्री परवाने पूर्ववत करावेत, ऑनलाइन परवान्यात समाविष्ट केलेले अर्ज ग्राह्य धरावेत, परवान्यामध्ये क ीटकनाशकांचे उगम प्रमाणपत्र दाखल करायला मुदत द्यावी, कीटकनाशक उत्पादक कंपन्यांना त्यांचे उगम प्रमाणपत्र विक्रेत्यांना देणे बंधनकारक करावे, कृषी विक्रेत्यांकडील खते,  औषधे, बियाणे यांचे हस्तलिखित साठा नोंदणीऐवजी संगणकीय नोंद ग्राह्य धरावी, अशा मागण्यात आहेत.