Breaking News

गोकुळकडून गाईच्या दूध खरेदीदरात 2 रुपयांची कपात

कोल्हापूर, दि. 02, नोव्हेंबर - गोकुळ कंपनीने आजपासून गाईच्या दूध खरेदी दरात दोन रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे याचा फटका शेतकर्‍यांना बसणार आहे. पूर्वी 28  रुपये 50 पैशांनी दुधाची खरेदी करण्यात येत होती.मात्र, आता गायीचे दूध 26 रुपये 50 पैसे होणार आहे. अतिरिक्त दुधात वाढ झाल्यामुळे खरेदी दरात कपात करण्यात आल्याचे  सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. दूध संघाने खरेदी दरात कपात केली असली तरी विक्री दरात मात्र कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे ग्राहकांना गायीचे दूध 45 रुपये प्रति लीटर  दरानेच मिळणार आहे.