Breaking News

नोटबंदीसाठी देशाची माफी मागावी - मोहन जोशी

पुणे, दि. 08, नोव्हेंबर - नोटाबंदीच्या निर्णयास 8 नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. केंद्र सरकारने केलेल्या काळ्या पैशाला पायबंद घालण्याचा दावा नितांत खोटा ठरला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटाबंदीचा निर्णय विचारहीन आणि दिशाहीन होता. या सर्व गोष्टींबद्दल देशातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी  यांनी केली आहे.
या निर्णयाचे समर्थन करताना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकार्यांची दमछाक होत आहे. नोटाबंदीमुळे दहशतवाद संपला नाही, ना काळा पैसा, बनावट नोटा  संपलेल्या नाहीत. या निर्णयामुळे देशाचे नुकसान झाले असून पिकांचा दर घसरला आहे, प्रगती मंदावली आहे, लाखो तरुणांचे रोजगार गेले आहेत. औद्यागिक उत्पन्न घसरले आहे.  रांगेत उभे राहिलेल्या 145 नागरिकांचा बळी गेलेला आहे. या सर्व गोष्टींबद्दल भाजपने देशातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी केली  आहे.