पुणे महापालिकेत कोट्यवधींचा भरती घोटाळा-राष्ट्रीय मजूर संघ
पुणे, दि. 08, नोव्हेंबर - महापालिकेमध्ये कंत्राटी सुरक्षा रक्षकांना महापालिका कायद्यानुसार किमान वेतन दिले जाते. सुरक्षा रक्षकांसाठी वेगळा कायदा असतो. पण, ठेकेदारांच्या फायद्यासाठी कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षक भरती करण्यात आली असून, यात कोट्यवधींचा घोटाळा झाला. या प्रकरणाची चौकशी करुन कडक कारवाईची मागणी राष्ट्रीय मजूदर संघाचे अध्यक्ष सुनिल शिंदे यांनी केली आहे.
सुनिल शिंदे म्हणाले, राज्य शासनाने 2006 साली पुणे जिल्हा सुरक्षा मंडळामार्फत कंत्राटी सुरक्षा रक्षकांची भरती करावी, असे आदेश महापालिकेला दिले होते. सुरक्षा रक्षकांना किती वेतन द्यावे यासंदर्भातील सूचना सुद्धा या आदेशामध्ये करण्यात आल्या होत्या. या आदेशाला महापालिका प्रशासनाने केराची टोपली दाखवली, असा आरोप शिंदे यांनी केला आहे. महापालिकेत कंत्राटी सुरक्षा रक्षकांना जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या नियमानुसार वेतन देण्यात यावे. हे वेतन त्वरीत न दिल्यास फौजदारी दाखल केली जाईल, असेही ते पुढे म्हणाले.
महापालिकेने 900 सुरक्षा रक्षकांची भरती ठेकेदारामार्फत केली आहे. अशा प्रकारे महापालिकेला खासगी ठेकेदाराकडून भरती करता येत नाही. पण, ठेकेदारांच्या फायद्यासाठी के लेल्या या भरतीमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली.