Breaking News

आश्‍वासने नकोच; प्रत्यक्ष कृतीवर भर - डॉ. सुजय विखे

अहमदनगर, दि. 07, नोव्हेंबर - मोफत अपघात विमा योजनेप्रमाणेच आता मतदार संघातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य विमा योजना सुरु करण्याचा विचार आहे. पद्मभूषण डॉ.  बाळासाहेब विखे पाटील यांच्या पहिल्या स्मृतीदिनीही योजना कार्यान्वित करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या योजनांचा पाठपुरावा आपल्या मतदारसंघात  सातत्याने सुरु असतो. विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि मी स्वत:हा वैयक्तिकरित्या याचा पाठपुरावा करीत असतो. इतर नेत्यांसारखे केवळ आश्‍वासने आम्हाला जमत  नाहीत. प्रत्यक्ष कृती करण्याची आमची पध्दत आहे, असे प्रतिपादन युवा नेते डॉ. सुजय विखे यांनी केले.
कोल्हार आणि पंचक्रोशीत उज्वला गॅस योजनेअंतर्गत योजनेतील पात्र ग्रामस्थांसाठी मोफत गॅस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी डॉ. भास्करराव  खर्डे होते. यावेळी माजी सरपंच अँड. सुरेंद्र खर्डे, बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, उपसभापती बबलू म्हस्के, भगवती देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष भाऊसाहेब खर्डे, प्रवरा  सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अशोक असावा, उपसरपंच स्वप्नील निबे, भगवतीपूरचे सरपंच रावसाहेब खर्डे, जि. प सदस्य दिनेश बर्डे, कविता लहारे, भरत अंत्रे, पंचायत समिती सदस्य  संतोष ब्राम्हणे, कारखान्याचे संचालक विजय खर्डे, राजेंद्र खर्डे, तहसिलदार माणिकराव आहेर, सुभाष दळवी आदी याप्रसंगी उपस्थित होते. 
लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत शिर्डी विधानसभा मतदार संघ हा अव्वल स्थानी आहे. येणा-या काळात ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून वैयक्तिक  लाभाच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे नमुद करतानाच, मतदारसंघातील नागरिकांसाठी आता मोफत
डॉ. विखे म्हणाले, की उज्वला गॅस योजनेअंतर्गत आतापर्यंत शिर्डी मतदार संघात 1 हजार 800 कुटुंबियांना गॅसचे वितरण करण्यात आले आहे. शासनाच्या योजनेचा लाभ कु टुंबापर्यंत पोहचविण्यात शिर्डी मतदार संघ हा अग्रेसर आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी प्राधान्याने होत  असल्याचे त्यांनी नमुद केले.
बहुतांशी नागरीकांची तक्रार ही रेशनकार्ड मिळत नसल्याची आहे. याकडे लक्ष वेधून डॉ. म्हणाले, की प्रत्येक कुटुंबाला रेशनकार्ड मिळालेच पाहीजे. यासाठी आता आपणच पुढाकार  घेणार असून, शासकीय यंत्रणेच्या सहकार्याने प्रत्येक कुटूंबाला रेशनकार्ड उपलब्ध करुन देणे यासाठी विशेष मोहीम मतदारसंघात हाती घेतली जाईल. शासकीय कार्यालयात हेलपाटे  मारुनही लोकांची कामे होत नाहीत.
यामुळे येणा-या तक्रारींचे निराकरण होण्यासाठी दि. 1 जानेवारीपासून ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम गावनिहाय आयोजित केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिर्डी मतदार संघात मोफत अपघात विमा योजना आपण सुरु केली. देशपातळीवर अशा प्रकारची योजना सुरु करणारा शिर्डी मतदार संघ हा एकमेव आहे. आजपर्यंत 50 हून अ धिक कुटूंबांना 1 कोटी रुपयांचा लाभ या योजनेतून मिळाला, याचे समाधान आहे. शासनावर अवलंबबून न राहाता मतदारसंघातील आपल्या नागरिकांसाठी आपण काय करतो, हे  महत्वाचे आहे.
या कार्यक्रमास कोल्हार आणि पंचक्रोशीतील नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.