Breaking News

‘महावितरण’च्या विरोधात मनसेचे आमरण उपोषण

अहमदनगर, दि. 07, नोव्हेंबर - तालुक्यातील भानगाव येथील नवीन झालेले सबस्टेशन त्वरीत चालू करण्याच्या मागणी साठी मनसेच्या वतीने तहसिल कार्यलयासमोर आमरण   उपोषण करण्यात आले.             महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीने परीसरातील वीजेच्या   मागणीचा विचार करून नवीन सबस्टेशन केले आहे.  सबस्टेशनचे काम पूर्ण झाले  असून ते सुरू केले नसल्यामुळे शेतकर्‍यांना पुरेशी वीज मिळत नाही.  त्यामुळे वैतागलेल्या शेतकरांनी अखेर मनसेचे अतुल कोठारे, अमोल कोहक पंचायत समितीचे  सदस्य  सुरेश  गोरे यांच्या नेतूत्वाखाली अमर उपोषण दिः6 रोजी आमरण उपोषण सुरू केले आहे. 
याबाबत कनिष्ठ अभियंत्याने सांगितले की  श्रीगोंदा शहरातून एका शेतकर्‍याने अडथळा  निर्माण केल्याने कामास उशीर झाला  आहे . परंतु आठ दिवसात काम पूर्ण करू.  या  उपोषणास बाळासाहेब दांगट:’, राजेंद्र म्हस्के ,सुनिल भोस आमदार राहुल जगताप यांचे स्वीय साहाय्यक अक्षय काळे नी भेटी दिल्या. शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.