Breaking News

विकासाचा दृष्टीकोन ठेवल्यास अडथळे दूर होतात

अहमदनगर, दि. 07, नोव्हेंबर - विकासकामे करताना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र त्यावर मात करण्यासाठीच जनतेने आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले  असते. जनहिताच्या विषयांवर फक्त राजकीय स्वार्थ न पाहता विकासाचा दृष्टीकोन ठेवल्यास अडथळ्यांवर मात करता येते. महापालिकेत सत्ता आल्यापासून शिवसेना अशाच पध्दतीने  राजकारण विरहित कामे करीत आहे. त्यामुळेच विरोधकांना शक्य न झालेले फेज टू पाणी योजनेचे काम आमच्या कार्यकाळात अंतिम टप्प्याकडे आले आहे. लवकरच नगरकरांना या  योजनेतून मुबलक पाणी मिळेल, असा विश्‍वाटस महापौर सुरेखा कदम यांनी व्यक्त केला.
नगरकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या शहर सुधारित पाणी योजना फेज टूच्या कामाचा महत्त्वाचा टप्पा महापौर कदम यांच्या पुढाकाराने मार्गी लागला आहे. औरंगाबाद  रोडवरील नटराज हॉटेल परिसरातील सय्यद ताहीर हुसैन शाह दर्गा येथील फेज टूचे काम महापौर कदम यांच्या संवादाच्या भूमिकेमुळे मार्गी लागले आहे. या कामाच्या शुभारंभप्रसंगी  त्या बोलत होत्या. यावेळी सचिन जाधव, मुजावर निसार जहागीरदार, अमीर जहागीरदार, राजे जहागीरदार, संभाजी कदम, दत्ता जाधव, काका शेळके, इंजि.परिमल निकम, फराहन  जहागीरदार, बाळासाहेब बारस्कर आदी  उपस्थित होते.
महापौर कदम पुढे म्हणाल्या की, काही दिवसांपूर्वीच ईदगाह मैदानातून जाणारर्‍यात फेज टूच्या जलवाहिनीचे काम तेथिल ट्रस्टींशी संवाद साधून मार्गी लावले. विकासकामे करताना  अशी सकारात्मक भूमिका घेतल्यास सर्वांचचे सहकार्य मिळते. आताही सय्यद ताहीर हुसैन शाह दर्गाच्या विश्‍व्स्तांशी अतिशय सौहार्दाच्या वातावरणात चर्चा केली.