Breaking News

तालुक्यातील पिंपरखेड येथील ग्रामपंचायतीत शिपाई भरती घोटाळा

अहमदनगर, दि. 01, नोव्हेंबर - पिंपरखेड ग्रामपंचायतमध्ये पहिले दोन शिपाई कर्मचारी काम करीत असताना तिसर्‍या शिपाईपदाची  भरती करून सरपंचांच्या नातेवाईकाची या  पदावर वर्णी लावण्यात आल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. ही शिपाई भरती  दि. 2 मे. 2016 च्या ग्रामसभेचे बनावट दस्ताऐवज तयार करून करण्यात आली.ं नेमणूक करतेवेळी भाऊसाहेब झिंजाडे यांचे वय 45 होते. पिंपरखेडचे सामाजिक कार्यकर्ते  रणजित म्हस्के  यांनी शिपाईपदाच्या भरती प्रक्रियेची माहितीच्या अधिकाराखाली  मागणी केली असता त्यांना मिळालेल्या माहितीत हा प्रकार स्पष्ट झाला.
ग्रामपंचायतमध्ये  दि. 2 मे 2016  या तारखेला ग्रामसभा  घेण्यात आली. या सभेत एकच अर्ज आला. तो भाऊसाहेब झिंजाडे यांचा होता. त्या अर्जाला ग्रामसभेत विषय क्रमांक 4 व ठराव क्रमांक 4  मध्ये ठराव मंजुरी देण्यात आली. या ठरावास सूचक म्हणुन फय्याज शेख यांचे नाव देण्यात आले आहे. परंतु फय्याज शेख हे या ग्रामसभेला उपस्थित नव्हते. त्यांची ग्रामसभेच्या उपस्थित सही रजिस्टरला नाव नाही व सही  सुद्धा नाही. तसेच सरपंच कांचन बापुराव ढवळे या सुद्धा या ग्रामसभेला उपस्थित नव्हत्या. त्या़ंची ही या ग्रामसभेच्या उपस्थित सही रजिस्टरला  नाव व सही दिसून येत नाही. तसेच भाऊसाहेब झिंजाडे यांचा जो अर्ज  ग्रामसभेत आला, त्या अर्जावर ग्रामसभेची तारीख दिसून येत नाही. तसेच शिपाई भरतीवेळेस  त्यांचे वय 45 होते. जिल्हा परिषदेमध्ये शिपाई वर्गाला  वयाची अट  असताना  यांची नेमणूक कशी करण्यात आली, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
तत्कालीन ग्रामसेवक महेश जगताप व सरपंच कांचन ढवळे यांनी  ग्रामपंचायतीच्या एकाही सद्स्याला व ग्रामस्थांना शिपाई भरती केलेले एक वर्ष  माहिती दिली नाही. एक वर्ष या कर्मचार्‍याला घरी बसून 7 हजार 700 रूपये पगार देण्यात आली . हा शिपाई दि. 29 मे 2010 पासून भारत संचार निगम लि. मध्ये शिपाई म्हणून  आजतगायत तेथेही काम करीत आहे. हा शिपाई केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा एकाच वेळी पगार घेणारा महाराष्ट्रात पहिलाच कर्मचारी आहे. हा कर्मचारी सरपंचांच्या जवळचा नातेवाईक असल्याने  ग्रामसेवक व सरपंच यांनी ग्रामसभेचे बनावट  दस्ताएवज तयार करुन  शिपाई पदावर नेमणूक केली आहे.
या ग्रामसभेत शिपाई भरतीसाठी वरिष्ठ कार्यलयाचे  ग्रामपंचायतीला आदेश नसतानाही शिपाई भरती  संगनमत करुन करण्यात आली.
भरतीची चौकशी करुन सबंधीतावर फौजदारी गुन्हे दाखल  करण्यात यावे. अन्यथा जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा रणजित म्हस्के  यांनी इशारा दिला आहे.