Breaking News

साईबाबा चौफुली ते उक्कडगाव रस्ता दुरुस्तीचे काम सुरू

अहमदनगर, दि. 01, नोव्हेंबर - साईबाबा चौफुली ते संजीवनी, पढेगाव, उक्कडगाव रामा 65 हा मार्ग अंत्यत खराब झाला होता.त्यात संजीवणी ते साईबाबा चौफुली हे तिन ते चार किमी अंतर चालकांची परिक्षा बघणारे ठरत असताना सोशल मिडीयावर त्याची भरपूर खिल्ली उडविण्यात आली होती.त्यात गाडी डोक्यावर घेऊन चालण्याचे कार्टुन आणि मुतखडा असणार्‍यांनी या रस्त्याने प्रवास केल्यास मुतखडा पडतो, असे संदेश व्हायरल झाल्यामुळे त्याची दखल घेत दै. लोकमंथनने यावर प्रकाश टाकुन वृत्त प्रकाशित केले होते.त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ दखल घेऊनृ आज या रस्त्यावर असलेली खड्डे बुजविण्यास प्रारंभ केला आहे.
साईबाबा चौफुली ते रेल्वे स्टेशन हा चौपदरीकरण आणि तेथून पुढे पढेगाव, उक्कडगाव पर्यंत या रस्त्यासाठी मजबुतीकरणासाठी विस कोटी रुपये मंजुर असुन अद्याप कामास सुरुवात झालेली नसली तरी एक नोव्हेंबरला त्याची निविदा निघत आहे.
तोपर्यंत नागरीकांचा रोष कमी करण्यासाठी या रस्त्यावरील खड्डे बुजवून बांधकाम विभागाने तात्पुरती मलमपट्टी करुन की होईना काही प्रमाणात नागरीकांचा रोष कमी होण्यास मदत होणार आहे.