Breaking News

सोहराबुद्दीन खटल्याच्या वार्तांकनावर न्यायालयाची मनाई


मुंबई : गुजरातमधील सोहराबुद्दीन व तुलशीराम प्रजापती यांच्या बनावट चकमकी संबंधीच्या खटल्याचे वार्तांकन करण्यास सीबीआयच्या विशेष न्यायालयाने प्रसारमाध्यमांना मनाई केली आहे. सोहराबुद्दीन आणि तुलशीराम प्रजापती यांचे प्रकरण संवेदनशील आहे. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान काही वेळा वातावरण गंभीर होते. या परिस्थितीत आरोपींवर हल्ला होऊ शकतो. प्रसारमाध्यमांनी या याचिकेतील सुनावणीचे वृत्त प्रसारित केल्यास समजात दुफळी निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना खटल्याचे वृत्तांकन करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी आरोपीच्या वकिलाने केली होती. अखेर न्यायालयाचे प्रकरणाची संवेदनशीलता पाहत खटल्याचे वार्तांकन करण्यास प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मनाई केली.