Breaking News

श्रीलंकेच्या कर्णधारपदी परेराची निवड

कोलंबो : भारताविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि ट्वेण्टी-२० मालिकेसाठी श्रीलंका संघाच्या कर्णधारपदी थिसारा परेराची निवड करण्यात आली आहे. उपुल थरंगाकडून परेरा नेतृत्वाची सूत्रे स्वीकारेल. भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेण्टी-२० सामने होणार आहेत. 


थरंगा कर्णधार असतानाच श्रीलंकेला भारताकडून नऊ सामन्यांतून पराभव पत्करावा लागला होता. कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेण्टी-२० प्रकारात भारताने श्रीलंकेला व्हाईटवॉश दिला होता. एंजेलो मॅथ्युज जखमी झाल्यामुळे उपुल थरंगाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कर्णधार म्हणून निवड झाली होती.