संजय निकस पाटील यांना अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार जाहीर
बुलडाणा, दि. 06, नोव्हेंबर - राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अभियानाला पुरक आणि पोषक लिखाण केल्याबद्दल पत्रकारांना दिल्या जाणा:या पुरस्कारामध्ये बुलडाणा जिल्ह्यातून प्रथम पुरस्कार संजय निकस पाटील यांना जाहीर झाला आहे. त्यांना 8 नोव्हेंबर रोजी अकोला येथे होणा-या कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.
वर्ष 2015 मध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले, आताही समोर सदर अभियानाचे कामकाज, अंमलबजावणी सुरु आहे. अभियानाला पोषक असे वातावरण तयार करणे, पुरक आणि व्यापक माहिती प्रसिद्ध करणे अभियानाच्या प्रचार-प्रसार कामात हिरीरीने सहभाग घेतल्याबद्दल पत्रकारांना पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यामध्ये संजय निकस पाटील यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.