दिवाळीच्या सुटीत इयत्ता पाचवीचे समायोजन
बुलडाणा, दि. 06, नोव्हेंबर - पाडळी येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत पहिल्या शैक्षणिक सत्रापासून पाचवा वर्ग सुरू करण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यासह पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. परंतु ऐन दिवाळीच्या सुटीत शिक्षण विभागाने माध्यमिक शाळेत या वर्गाचे समायोजन केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजन पडले आहे. विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्राथमिक शाळेतच पाचवीचा वर्ग सुरू करण्यात यावा, अशी मागणी पालक करीत आहेत.
येथील मराठी प्राथमिक केंद्रिय शाळेत इयत्ता पहिली ते चवथीपर्यत वर्ग आहेत. या शाळेत गावातील शेकडो विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. दरम्यान मार्च सन 2016 मध्ये शासनाने चवथीच्या शाळेला पाचवा वर्ग जोडण्यात यावा, असे आदेश दिले होते. या आदेशानुसार जून पासून सदर शाळेत पाचवा वर्ग सुरू करण्यात आला आहे. सदर वर्ग सुरू करण्याची तसेच शाळा समितीच्या ठरावासह शिक्षण विभाग पालकांना माहिती देण्यात आली होती. इयत्ता पाचवीमध्ये 36 विद्यार्थी शिक्षण घेत होते. त्यावेळी कोणत्याही विद्यार्थ्याची किंवा पालकाची कुठलीच तक्रार नव्हती. पहिल्या सत्रापर्यत हा वर्ग सुरळीत सुरू होता. परंतु ऐन दिवाळीची सुटी संपताच सदर वर्गाचे समायोजन जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयात करण्यात आले. विशेष म्हणजे या बाबतची सूचना शाळा समितीसह कोणत्याही पालकास देण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यासह पालकामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. विद्यार्थ्याची हेळसांड थांबविण्यासाठी हा वर्ग पुर्ववत सुरू करण्यात यावा, अशी मागणी शाळा समिती सदस्यासह पालकांनी निवेदनाद्वारे शिक्षणाधिकार्याकडे केली आहे.
दोन महिन्यात शिक्षण विभागाचे दोन पत्र
शिक्षण विभागाने 22 सप्टेंबर 2017 ला ज्या प्राथमिक शाळेत पाचवा वर्ग जोडला आहे, तो कायम ठेवावा, असे पत्रक काढले होते. त्यानंतर 10 ऑक्टोबरला सदर सुरू केलेला वर्गाचे जवळच्या शाळेत समायोजन करण्यात यावे, असे पत्रक काढले आहे. अवघ्या दोन महिन्यात वेगवेगळी दोन पत्रक काढल्याने शिक्षकामध्ये संभ्रमावस्था पसरली आहे.