काकडा आरतीच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश
बुलडाणा, दि. 06, नोव्हेंबर - आध्यात्मासोबत’बेटी बचाओ, बेटी पढाओ, सार्वजनिक स्वच्छता राखा’ असा सामाजिक संदेश देत मोताळा येथील प्रभाग क्रमांक 16 मधील काकडा आरतीचा समारोप सोहळा वारकर्यांच्या टाळमृदुंगाच्या निनादामध्ये नोव्हेंबर रोजी पार पडला. या दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आला. पुरोगामी महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा फार मोठा वारसा लाभला आहे.
’नाम तुकोबाचे घ्यावे पुढे पाऊल टाकावे’ या अभंगाने वारकरी धर्माची भागवत पताका घेवून सकाळी वाजता कार्तिक महिन्यामध्ये वारकरी गावामध्ये काकडा आरतीची परिक्रमा करण्यास बाहेर पडतात असे चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहावयास मिळते. कोजागिरी पौर्णिमेनंतर कार्तिक महिन्यामध्ये काकडा आरतीला सुरुवात होते. त्रिपुरी, त्रिपुरारी किंवा देवा दिवाळी म्हणूनसुद्धा याला संबोधल्या जाते. साधारणत: ग्रामीण भागामध्ये काकडा आरती व्हायची पण याचे लोण आता शहरी भागामध्ये सुद्धा पसरले आहे. येथील प्रभाग क्रमांक 16 हा सुशिक्षित नोकरवर्गाचा प्रभाग म्हणून ओळखल्या जातो. परंतु या भागामध्ये सुद्धा मागील एका महिन्यापासून काकडा आरतीचे स्वर गुंजत असून जवळपास 100 वारकरी रोज काकडा आरतीसाठी उपस्थित असतात. आध्यात्म हा जीवनाचा सार असून आध्यात्माच्या गोडीसोबत सामाजिक संदेश सुद्धा सर्वांना द्यावा, या उद्देशाने आज काकडा आरतीच्या सांगता सोहळ्यामध्ये हेल्मेट वापरा जीव वाचवा, बेटी बचाओ बेटी पढाओ, खुले मे शौचा जाना बंद करो, शौचालय अपनाओ यासारखी विविध फलके दाखवुन सामाजीक दिंडी सर्वांचे लक्ष वेधुन घेत होती.
यावेळी प्रेमसिंह ठाकुर, डॉ. भरत सपकाळ, आत्माराम मालठणकर, राजु गर्दे, मनोहर ठाकुर, रमेश अप्पा मंडळकर, घनश्याम व्यवहारे, सुरेश सदाणी, शांताराम सातव, प्रा. एम. एन. देशपांडे, डॉ. रवींद्र महाजन, के. टी. देशमुख, एस. एन. पाटील, प्रमोद शिंबरे, सुधाकर कोळसे, वसंतराव देशमुख, घनश्याम व्यवहारे, सुरेश मानकर, धनराज झंवर, संतोष गावंडे, माळी, पंजाबराव देशमुख, नारायण कुकडे, किसन वराडे, प्रकाश बावस्कार, तुळशीराम लवंगे, प्रा. गणेश झंवर, संजय पाटील, प्रदीप गावंडे, एम. जी. खर्चे, रमणसींह राजपूत, धोरण, माळी, विठ्ठल नारखेडे आदी वेळी उपस्थित होते.