Breaking News

जिल्हा प.गटात लेक लाडकी अभियाण राबविणार- गिरमकर

श्रीगोंदा प्रतिनिधी, दि. 03, श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव गटामध्ये  ’ लेक माझी लाडकी ’ अभियाना राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्या पंचशीला गिरमकर यांनी सांगितले. 
आढळगाव येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात कँन्सर आणि मेंदुविकार तपासणी शिबीराप्रसंगी गिरमकर यांनी ’ लेक माझी लाडकी ’ या वैयक्तिक अभियानाची घोषणा केली. यावेळी सभापती पुरुषोत्तम लगड, पंचायत समिती सदस्या मनिषा कोठारे, सरपंच मिरा वाकडे, देवराव वाकडे , बापु जाधव  ,उपसरपंच
जिजाराम डोके, अशोक शिंदे,  तालुका वैद्यकीय अधिकारी नितीन खामकर, डॉ. संदिप पुंड, डॉ. शैला डांगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्त्री - भ्रुण हत्या टाळण्याबरोबरच जन्म झालेल्या प्रत्येक मुलीचे स्वागत करणे आवश्यक असून तीच्यासाठी सामाजिक वातावरण सुधारणे गरजेचे
असल्यामुळे आपण असे अभियान सुरु केले आहे. यामध्ये मुलीच्या मातेचाही गौरव करण्यात येणार आहे.तीच्या कुटुंबाचे मनोबल वाढण्यासाठी प्रबोधन करण्याचा प्रयत्न या अभियानाव्दारे करण्यात येणार आहे.