Breaking News

धनश्री पंतसंस्थेविरूद्ध फसवणूकची तक्रार

श्रीगोंदा प्रतिनिधी, दि. 03, काष्टी येथील धनश्री पंतसंस्थेने फसवणूक केल्याची तक्रार श्रीगोंदा पोलिसात आंबादास भानुदास राहिंज यांनी दाखल केल्याने सहकार क्षेत्रात चांगलीच खळबळ उङाली आहे. 
याबाबत सविस्तर वूत्त असे की तालुक्यातील काष्टी या गावातील धनश्री पंतसंस्थेत आंबादास यांचे आई ,वडील,पत्नी,मुलगी  यांचे नावे मुदत ठेवी एकूण  रक्कम रूपये 2366900/ ठेवल्या  होत्या तसेच दैनंदिन  कलेक्शनपोटी 35900/  भरले होते व ङाँःपांङूरंग दातीर व त्यांची पत्नी विद्या यांचे
1050000/ सदर मुदत ठेवीच्या कालावधी पूर्ण  झाल्याने पैसाची मागणी केली असता  संस्थेच्या चेअरमन ज्योती गवळी यांनी मला खोट्या सावकारी केसमध्ये गुंतवून माझी नोकरी घालविण्याची धमकी दिली तसेच चेअरमन यांचे पती कलेक्शन एंजट यांनी दिलेला धनादेश पारीत झाला नसल्याचे फिर्यादीत नेञ चिकीत्सक रांहिज यांनी म्हटले आहे तक्रार दाखल होताच चेअरमन व त्यांचे पती फरार झाले असून या गुन्हाचा तपास पोलिस  निरीक्षक बाजीराव पवार करत आहेत.