Breaking News

तालुक्यात दुष्काळ जाहीर करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार : देवानंद पवार

बुलडाणा, दि. 3, नोव्हेंबर - नुकतीच शासनाच्या महसूल विभागाने चुकीच्या पद्धतीने आणेवारी काढत काही ठिकाणी 55 ते 63 पर्यंत आणेवारी काढली आहे. तसेच तालुक्याममध्ये  पावसाचे प्रमाण साधारण असले तरी अनियमित व अवकाळी पाऊस झाले असून, तालुक्यातील कपाशी,  मुंग, उडीद व सोयाबीन या प्रमुख पिकांच्या उत्पन्नात कमालीची घट झाली  असुन शासनाने शेतकर्‍यांच्या माल हेक्टरी कमी प्रमाणात खरेदी करण्याच्या सुचना संबंधीत विभागास नियमित केल्या आहेत. 
एकीकडे शासन म्हणते पिके कमी झाले. म्हणून शेती माल जास्त खरेदी केल्या जाऊ शकत नाही आणि दुसरीकडे पैशेवारी (आणेवारी ) मात्र पन्नास पैशाच्या व सर्वेक्षणात दिसत  आहे. शासनाच्या अशा कार्य पद्धतीला म्हणावे तरी काय असा प्रश्‍न शेतकर्‍यांच्या समोर अडचण निर्माण करीत आहे. तसेच महसूल विभागाने चुकीच्या पद्धतीने सर्वेकरून दबाव  तंत्राचा वापर करून शेतकर्‍यांकडून मागविला असल्याचे नाकारता येत नाही. तरी सुद्धा सरकारने दुष्काळाचा लाभ शेतकर्‍यांना मिळु नये म्हणून दुष्काळ जाहीर करण्याचे निकष व क ार्यपद्धती बदलेली आहे. ही बाब निंदनीय आहे. व सरकारच्या या शेतकरी विरोधी निर्णयाचा काँग्रेस पक्ष निषेध करतो व आलेली जानेवारी चे सर्वक्षण रद्द करून नवीन व अंतिम  आणेवारी जाहीर करावी व केंद्र शासनाने दुष्काळ जाहीर करण्याचे निकष व कार्यपध्दतीत बदल करून वास्तविक पडताळणी व तालुक्याता दुष्काळ जाहीर करवा असे निवेदन मेहक र तालुका  काँग्रेस पक्षाचे ता.अध्यक्ष देवानंद पवार यांच्या नेतृत्वात तहसीलदार मेहकर यांना देण्यात आले.  यावेळी  शामभाऊ उमाळकर, लक्षण घुमरे, कासम गवळी, कलीम  खान, विनोद पर्‍हाड, वसंतराव देशमुख, शैलेश सावजी, अनिल चांगडे तसेच मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.