चिखली तालुक्यात दुष्काळ जाहीर करा; अन्यथा आंदोलन
बुलडाणा, दि. 3, नोव्हेंबर - शासनाने यावर्षी खरीप हंगामाची आणेवारी काढतांना चुकीच्या पध्दतीने काढून ती जास्त दर्शवीली आहे. वास्तवीक चिखली तालुक्यात पावसाचे प्रमाण साधारण असले तरी, अनियमीत असून आवकाळी पाऊस पडल्यासारखे झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील कापुस, मुंग, उडीद, सोयाबीन या प्रमुख पिकांच्या उत्पन्नात घटच झालेली आहे. त्यामुळेच सरकारनेही शेती माल उत्पादनाचे प्रमाण कमी धरून त्यापेक्षा जास्त शेती माल खरेदी न करण्याचे फेडरेशनला कळविले, तर दुसरीकडे शेती उत्पन्नाची पैसेवारी क ाढतांना ती 50 पैशापेक्षा वर काढली.
अशा प्रकारे शासनाने शेतकर्यांची कुंचबना केली असून हा चुकीचा सर्व्हे बदलला जाण्याची गरज आहे. दबाव तंत्राचा वापर करून दुष्काळ जाहीर करण्याचे निकष व कार्यपध्दती सरकारने बदलली ही बाब निंदणीय असून काँगे्रस पक्ष त्याचा निषेध करतो. तेव्हा सध्या आलेली आणेवारी सव्हेक्षण रद्द करून नविन व अंतीम आणेवारी जाहीर करावी व तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात यावा. अशी मागणी चिखली तालुका व शहर काँगे्रस कमिटीच्या वतीने 02 नोव्हेंबर रोजी चिखली तहसिलदार यांना निवेदन देवून करण्यात आलेली आहे. जर दुष्काळ जाहीर झाला नाही तर शेतकर्यांसह काँगे्रसकडून तिव्र आंदोलन छेडण्यात असा इशाराही निवेदनातुन देण्यात आलेला आहे.
चिखली तहसिल कार्यालयात नायब तहसिलदार कानडजे साहेब यांनी सदर निवेदन स्वीकारले. यावेळी तालुका कॉगे्रस कमिटीचे अध्यक्ष विष्णु पाटील कुळसुंदर, बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, तालुका युवक कॉगे्रसचे अध्यक्ष रमेश सुरडकर, समाधान सुपेकर, डॉ. मोहमंद इसरार, बाजार समितीचे संचालक ईश्वर इंगळे, विजय पाटील, रूपराव पाटील, न.प. विरोधी पक्षनेता रफिकसेठ, नगरसेवक दिपक खरात, राजु रज्जाक, दिपक थोरात, विजय गाडेकर, सुनिल कासारे, गोकुळ शिंगणे, प.स.सदस्य शेख नासीर, प्रशांत देशमुख, सचिन बोंद्रे, कैलास खराडे, तुषार भावसार, मकरंद भटकर, तुषार भावसार,भास्कर आढाळकर, गोविंदराव देशमुख, जिवनबापु देशमुख, समाधान देशमुख, बबनराव पानझाडे, गजानन घयाळ, शिवाजी म्हस्के, राजु सावंत, समाधान भटकर, ईश्वर जाधव, संदिप चिंचोले, यांची उपस्थिती होती.