संवेदनशील मनाने रोहयोच्या योजनांची अंमलबजावणी करावी : जयकुमार रावल
बुलडाणा, दि. 3, नोव्हेंबर - रोजगार हमी योजनेवरील खर्च हा केंद्र शासनाच्या तिजोरीतून होत असतो. त्यामुळे या योजनेतंर्गत करण्यात येणार्या कामांना कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता पडत नाही. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतंर्गत महाराष्ट्र जनकल्याण समृद्ध योजना राज्यात राबविण्यात येत आहे. त्यानुसार सामान्य माणसाचे जीवनमान उंचावणार्या विविध उपक्रम राबविण्यात येतात. या योजना संवेदनशील मनाने राबविल्या पाहिजेत, अशा सूचना राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात महाराष्ट्र जनकल्याण समृद्ध योजना व पर्यटन विभागाच्या योजनांचा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आढावा घेताना रोहयो मंत्री बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार सर्वश्री डॉ. संजय रायमूलकर, डॉ. शशीकांत खेडेकर, जि.प अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराज, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुळकर्णी, उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र जनकल्याण योजनेचे काम समाधानकारक असल्याचे सांगत रोहयो मंत्री म्हणाले, जिल्हा रोजगार हमी योजनेच्या विविध मुद्द्यांमध्ये राज्यात तिसर्या क्रमांकावर आहे. वेळेवर रोजगार हमी योजनेवरील मजूरांचे पगार देण्यामध्ये जिल्ह्याचे काम 80.6 टक्के आहे. राज्यामध्ये कुशल मजूरीचे पैसे लवकरच देण्यात येणार आहे. अकुशल कामाचे पैसे देण्यात आले आहे. योजना गतिमान करून भ्रष्टाचाराला कुठल्याही प्रकारची संधी ठेवण्यात येणार नाही. राज्य मनरेगाचा पैसा खर्च करण्यामध्ये देशात 9 व्या स्थानी असून यामध्ये आपणाला बराच पल्ला गाठायचा आहे. महाराष्ट्र जनकल्याण समृद्धी योजनेत सर्व योजना वैयक्तिक लाभाच्या आहेत. त्यामुळे योजनेवरील अनुदान अथवा मजूरी थेट बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील तणावग्रस्त शेतकरी कुटूंबांची यादी तयार करण्यात आली आहे. यामधील सर्व तणावग्रस्त विहीर पाहिजे असलेल्या कुटूंबांना विहीर देण्यात यावी. ते पुढे म्हणाले, अहिल्यादेवी विहीर सिंचन योजनेमध्ये प्रलंबित असलेल्या प्रशासकीय मान्यता गटविकास अधिकारी व तहसीलदार यांनी समन्वयाने दिल्या पाहिजे. प्रशासकीय मान्यता देण्याचे काम त्वरित पूर्ण करून कार्यारंभ आदेश द्यावेत. कल्पवृक्ष फळबाग योजनेतून मोठ्या प्रमाणावर फळबाग घेण्यात यावी. रोहयोमधून खर्च करण्यात येईल. सिताफळ फळपिक ाचे मोठे क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. अमृतकुंड योजनेतून शेततळे घेण्यात यावी. बैठकीचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी केले. आमदारद्वयींनी यावेळी मतदारसंघातील विविध विषय मांडले. बैठकीमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्री. राजपूत यांनी माहिती दिली. आभार प्रदर्शन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. बैठकीदरम्यान महाराष्ट्र जनकल्याण समृद्ध योजनेचे लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषि अधिकारी आदींसह संबंधित यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पर्यटन विभागाचा आढावा
रोहयो योजनांच्या आढाव्यानंतर पर्यटनाच्या पायाभूत सोयी सुविधांच्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये लोणार सरोवर विकास आराखडा व सिंदखेड राजा विकास आराखडा यांचा समावेश आहे. लोणार व सिंदखेड राजा विकास आराखड्याचे यावेळी सादरीकरण करण्यात आले.सिंदखेड राजामध्ये पुरातत्व विभागाने पायाभूत सोयी सुविधा निर्माण कराव्यात. तसेच नगर पालिकेने नागरी सुविधेची कामे करावीत. लोणार सरोवर विकास आराखडा 97 कोटी रूपयांचा असून शासनास सादर करण्यात आला आहे. तसेच सिंदखेड राजा विकास आराखड्यामधील 2 कोटी रूपये देण्यात आले आहे. पुरातत्व विभागाने सिंदखेड राजा ते आडगांव राजा भूयारी मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण करावे. तसेच पर्यटनाच्या दृष्टीने विकास करावा, अशा सूचना याप्रसंगी पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांनी दिल्या. या बैठकीला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अमरावती प्रादेशिक व्यवस्थापक सवई, पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.