बोगस फिटनेस प्रमाणपत्र वितरण करणार्या अधिकार्यांवर कारवाईची मागणी
नाशिक, दि. 11, नोव्हेंबर - नाशिकमधील आरटीओ यंत्रणा हॅक करून जवळपास 686 अवजड वाहनांना बोगस फिटनेस प्रमाणपत्र देण्यात आले असून बोगस फिटनेस प्रमाण वितरणात आरटीओच्या अधिकार्याचा हात असल्याचा संशय असल्याने सदर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जयवंत जाधव यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली आहे.
याबाबत आ. जाधव यांनी पत्रात म्हटले आहे की, प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक या कार्यालयाची यंत्रणा हॅक करून जवळपास 686 अवजड वाहनांना बोगस फिटनेस प्रमाणपत्र दिले गेल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. सदर घटनेबाबत आर.टी. ओ. कार्यालय नाशिक यांच्याकडून पोलिसांना दिल्या गेलेल्या माहितीच्या अनुषंगाने सदर वाहन फिटनेस प्रमाणपत्र धारकांची योग्य माहिती हेतूपुरस्कार अपूर्ण दिली जात असल्याने तपासाला योग्य दिशा न मिळता आरटीओ कार्यालयाकडून संबंधित अधिकार्यांना लपविण्याचे षडयंत्र दिसून येत आहे. या प्रक्रियेमध्ये कोट्यावधींचा अपहार झाल्याचा संशय असून सुमारे दीड ते दोन हजार बोगस अवजड वाहनांना बोगस फिटनेस प्रमाणपत्र वितरीत केल्याचा पोलिसांचा संशय आहे. तरी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आ. जाधव यांनी केली आहे.