Breaking News

शाळांच्या विकासासाठी सहकार्य करू-- उपसभापती मंडलिक

नेवासा /तालुका प्रतिनिधी/:- तालुक्यातील प्राथमिक शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू असे आश्वासन नेवासा पंचायत समितीच्या उपसभापती राजनंदिनी मंडलिक यांनी दिले.


नेवासा तालुक्यातील तरवडी येथे कुकाणा केंद्रातील 14 जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य व मुख्याध्यापक यांचे प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले.त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून उपसभापती मंडलिक बोलत होत्या.

केंद्र प्रमुख नवनाथ फाटके यांनी केंद्राच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. प्रशिक्षण तज्ञ मिसाळ यांनी व्यवस्थापन समितीला मार्गदर्शन केले. तुपे वस्ती शाळेचे मुख्याध्यापक संभाजी कडू यांनी प्रास्ताविक केले.शाळेसाठी लोकसहभागातून संगणक खरेदी,ध्वनिक्षेपक संच,कार्यक्रम व्यासपीठ,शाळा भिंती रंगकाम,बोलकी भिंत्तीचित्रे यासाठी प्रतिसाद मिळत आसल्याचे सांगून कर्तव्य दक्ष शिक्षक व ज्ञानरचनावादी अध्यापन यामुळे पटसंख्या 84 वरून 111 झाली आहे असे कडू यांनी सांगितले.

यावेळी कुकाण्याचे माजी सरपंच दौलतराव देशमुख,माजी केंद्र प्रमुख भाऊसाहेब दरवडे,भाऊराव घुले,त्रिांबक कण्हेरकर, जालिंदर तुपे,अरुण चोपडे,सायमन भारस्कर,भाऊसाहेब फोलाने, राजेंद्र बटुळे,देविदास घुले,महादेव तुपे,बापू वडगे,सविता पेहेरे,सविता तुपे,चांद सय्यद,बाबासाहेब इंगळे आदी उपस्थित होते.शिक्षक अंबादास कोरडे यांनी लोकसह भागातील कामांची माहिती दिली.राजेंद्र कोकरे यांनी सूत्रसंचालन केले.हरिशचंद्र ठोंबरे यांनी आभार मानले.