स्वाभिमानी शेतकरी संघटना पाथर्डी तालुका अध्यक्षपदी शरद मरकड
शेवगांव /प्रतिनिधी /- स्वाभिमानी शेतकरी संघटना पाथर्डी तालुका अध्यक्ष पदी शरद बाबासाहेब मरकड यांची निवड झाली आहे.घोटण येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजु शेट्टीनी त्यांची निवड केली . शरद मरकड हे पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे गावचे रहिवासी आहेत. गेल्या दोन वर्षा पासुन ते शेतकरी चळवळीत कार्यरत आहेत. आत्ताच झालेल्या किसान मुक्ती यात्रेत अहमदनगर मधुन स्वाभिमानी एक्सप्रेस ने जाणारे ते एकमेव आहेत .
खासदार शेट्टीनी त्याच्या पुढील कामासाठी दिल्या शुभेच्छा दिल्या . व्यासपीठावर माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत, युवा प्रदेशाध्यक्ष अमर कदम, मराठवाडा अध्यक्ष माणिक कदम ,पश्चिम अध्यक्ष प्रकाश बालवडकर, नगरदक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे राहुरी तालुकाध्यक्ष रवी मोरे, शेवगाव तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड, शहराध्यक्ष दत्तात्रय फुंदे आदी उपस्थित होते.-