Breaking News

जनहित शेतकरी संघटनेचे आजपासून काटा बंद आंदोलन


मुंबई, दि. 20, नोव्हेंबर - राज्यातील शेतक-यांच्या ऊसाला भाव मिळवुन देण्यासाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल साखर कारखान्यासमोर जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले धरणे आंदोलनाचे रूपांतर उद्या 20 नोव्हेंबरपासून काटा बंद आंदोलनमध्ये होणार आहे. क ारखान्यावरील वजन काटा बंद पाडून व ऊस घेऊन येणा-या बैलगाड्या, ट्रॅक्टर व ट्रक आडवून कारखान्याला होणारा ऊस पुरवठा बंद पाडण्यात येणार आहे, असे देशमुख यांनी सांगितले.