Breaking News

पाण्याच्या टाकीत पडून दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

पुणे, दि. 20, नोव्हेंबर - दिघी येथील वडमुखवाडी परिसरात 2 वर्षाच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची घटना आज (रविवारी) दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. शुभांश गौरव तिवारी असे मयत चिमुकल्याचे नाव आहे.शुभांश सकाळी नऊ वाजता नाश्ता करून घरातून खेळण्यासाठी घराबाहेर पडला. 


पण एक वाजत आला तरी तो घरी आला नाही व त्याचा खेळताना आवाज येत नसल्याने घरच्यांनी शोधा शोध केली असता शुभांश हा शेजारीच असलेल्या अपार्टमेंटच्या पाण्याच्या टाकीत पडल्याचे निदर्शनास आले. त्याला तातडीने पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.आपले मुल खेळत आहे. 

आसपाच्या प रिसरात खुले खड्डे, विजेच्या खुल्या तारा, पाण्याच्या खुल्या टाक्या असतील तर आधीच योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. आधीही मुले पाण्यात पडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना शहरात घडलेल्या आहेत. त्यामुळे पालकांनी व आसपासच्या नागरिकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे.