हौसाआई आठवलेंना सर्वपक्षीयांनी वाहिली आदरांजली
बांद्रा पूर्व च्या संविधान य आठवलेंच्या बंगल्यासमोर दिवंगत माता हौसाआई आठवलेंना आदरांजली वाहणार्या सभेचे विचारमंच बांधण्यात आला होता .बौद्धभिक्खू डॉ राहुल बोधी महाथेरो; भदंत खेमधम्मो महाथेरो यांच्यासह पूज्य भिक्खू संघाच्या उपस्थितीत दिवंगत माता हौसाआई आठवले यांचा जलदान विधी करण्यात आला . या विधीस ना रामदास आठवले सौ सीमाताई आठवले ;कु. जित आठवले सहभागी झाले होते.त्यानंतर आदरांजली सभा सुरू करण्यात आली .या सभेस हजारो लोक उपस्थित होते.आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.
बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर केंद्रिय मंत्रीमंडळात विराजमान होणारा रिपाइंचा एकमेव पहिला नेता म्हणून रामदास आठवलेंचा देशभर गौरवाने उल्लेख होत आहे.या लोकनेत्यास घड विणार्या आदर्श माता म्हणून हौसाआईंचा सर्व वक्त्यांनी कृतज्ञतेने गौरव करून आदरांजली वाहिली .
या सभेस रिपाइंचे विविध गटांचे प्रमुख तसेच भाजप मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार खासदार गोपाळ शेट्टी; माजी खा रामशेठ ठाकूर;राज के पुरोहित; भारत भालके; ता मिळनाडू चे आमदार डॉ कृष्णा स्वामी ; आमदार कपिल पाटील ; डॉ राजेंद्र गवई ;माजी आमदार उपेंद्र शेंडे ; मा.आ. सुमंतराव गायकवाड माजी आमदार अनिल गोंडाने; माजी मंत्री दयानंद मस्के; पद्मश्री कल्पना सरोज ; मल्लिका अमरशेख; मनोज संसारे आमदार सरदार तारासिंग प्रवीण बर्वे रिपाइंचे राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश महातेकर; सरचिटणीस मोहनलाल पाटील ; भुपेश थुलकर गौतमदादा भालेराव ; सुरेश ब बारशिंग ; हेमंत रणपिसे ; स्थानिक रिपाइं जिल्हा अध्यक्ष विवेक पवार किसन रोकडे लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर वैशाली शिंदे आनंद शिंदे प्रा प्रशांत मोरे विजय साबळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
