Breaking News

परवाना नसताना पैठणच्या साखर कारखान्याच्या गळित हंगामाचा मंगळवारी प्रारंभ

औरंगाबाद, दि. 07, नोव्हेंबर - संत एकनाथ साखर कारखान्याचा गाळप हंगामाला उद्या मंगळवारी प्रारंभ होत आहे असे असताना मात्र अद्याप ही या कारखान्याला गाळपचा  (क्रशिंग) परवाना नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आ.भुमरे यांच्या चेअरमन पदाच्या कार्यकाळात 18 वर्षे भाडेतत्वावर चालविण्यास घेणारे सचिन घायाळ यांच्यामते  आम्हालाच परवाना मिळणार असा दावा केल्याने कारखाना सुरू होतानाच मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे. संत एकनाथ कारखाना चालविण्या वरुण आमदार भुमरे,  सचिन घायाळ यांच्यात वाद झाल्याने सचिन घायाळ यांनी एक गळीत हंगाम पार पाडला त्या नंतर काही कारणा वरुण दोघात मतभेद निर्माण झाले. त्या मुळे घायाळ यांनी दूसरा  गळीत हंगामा सुरु केला नाही, ते आ. भुमरे यांच्यावर आर्थिक मागणी करत आहेत. आपण त्यांची मागणी पूर्ण करू शकत नाही त्यामुळे आपण गळीत हंगाम बंद ठेवत आहोत. असा  आरोप त्यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. भुमरे व घायाळ यांच्यात वाद झाल्या नंतर हा कारखाना बंद पडला. आता घायाळ व त्यांच्या मित्र पक्षाचे  पॅनलने या कारखान्यावर निवडून आले. तरी घायाळ व चेअरमन तुषार शिसोदे यांच्यामध्ये देखील मतभेद झाल्याने तुषार शिसोदे यांनी हा कारखाना नाशिक येथील शिला अतुल  शुगरला चालविण्यास 12 वर्षाच्या करारावर दिला. या वादामुळे कारखान्याला अद्याप गाळप परवाना नसल्याचे समोर आले आहे. जो पयरत गाळप परवाना मिळत नाही, तो पयरत  नियमानुसार गळीत हंगाम सुरु करता येत नाही असे असताना शिसोदे कारखाना उद्या सुरु करत आहेत. हे विशेष म्हणावे लागत आहे.