आरोग्य सेवेत अधिकारी, कर्मचारी, रूग्ण यांच्यात समन्वय हवा - खा. खैरे
औरंगाबाद, दि. 07, नोव्हेंबर - आरोग्य सेवा हीच ईश्वरसेवा मानून सर्वसामान्यांना सेवा देणे प्रत्येकांचे कर्तव्य आहे. आरोग्यसेवेच्या दिरंगाईचे परिणाम चांगले नसतात, त्यामुळे अ धिकारी, कर्मचारी, नागरिकानी यामध्ये समन्वय ठेवण्याचे आवाहन शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अंतर्गत गंगापूर तालुक्यातील लखमापूर येथे आरोग्य उपकेंद्र व कर्मचारी निवासस्थान इमारतीच्या बांधकामाचे लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. या आरोग्य केंद्रमुळे लखमापूर, गणेशवाडी, अमळनेर, कायगाव, भें डाळा आदीसह जवळपास 10 गावांचा कायमचा आरोग्यसेवेचा प्रश्न मिटला. माजी जि.प सदस्य संतोष माने पाटील यांनी याकामासाठी जवळपास 1 कोटींचा निधी मंजूर करून घेतला होता.
