जालन्यात अर्धमॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
जालना, दि. 07, नोव्हेंबर - आरोग्यदायी जीवनशैलीची माहिती होऊन आवड निर्माण होण्यासाठी फन रनर फाऊंडेशन यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अर्ध मॅराथॉन स्पर्धेचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, आमदार राजेश टोपे, माजी आमदार कैलाश गोरंट्याल यांनी झेंडे दाखवून शुभारंभ करण्यात आला. या स्पर्धेमध्ये जालना वासियांसह विविध जिल्ह्यातील स्पर्धकांनी उत्स्फ्ूर्त सहभाग नोंदविला. शहरातील मंठा चौफुली येथून या स्पर्धे स शुभारंभ करण्यात आला. स्पर्धकांचे मनोधैर्य वाढावे म्हणून पालकमंत्री बबनराव लोणीक र, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.
