Breaking News

परमेश्वराचे चिंतन करून जीवन व्यतित करा : डिसोझा



जगात शांतता हवी असेल तर परमेश्वराच्या सेवेशिवाय पर्याय नाही. प्रभू येशुचे दया क्षमा शांती या तत्वाचे पालन सर्वांनी करावे व परमेश्वराचे चिंतन करुन जीवन व्यतित करावे, असे आवाहन प्रमुख धर्मगुरु जोसेफ डिसोझा यांनी केले.
येथील ‘स्नेहसदन’ चर्च परिसरातील धर्मग्राम येथे पवित्र मारिया मातेच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आलेल्या भक्तांनी विविध अर्पने प्रार्थनासभेदरम्यान अर्पित केली. प्रमुख धर्मगुरुंनी उपस्थितांना प्रभू येशुची वचने वा संदेश याचे महत्व पटवून देत आशिर्वादपर प्रार्थना करत परमेश्वराची भक्ती व याचना याबाबत प्रबोधन केले. त्यावेळी ते बोलत होते.

यात्रेदरम्यान परिसर भक्तांनी फुलून गेला होता. यावेळी संपूर्ण परिसर विद्युत रोषणाईने सुशोभित करण्यात आला होता. स्वरानंद व आनंदतरंग या वाद्यवृदांच्यावतीने राजू साळवे व बबिता साळवे, सोनू साळवे, शशी साळवे, रवी शिरसाठ या कलाकारांनी परमेश्वराची वचने व संदेश संगीतमय वातावरणात प्रस्तूत करुन उपस्थित भक्तांना मंत्रमुग्ध केल्याने वातावरण भक्तीमय झाले होते. माता मारिया यात्रोत्सवाचे यंदाचे २२ वे वर्ष होते. यात्रेदरम्यान धर्मगुरु जोसेफ डिसोझा, जोसेफ गायकवाड, फादर राजू शेळके, फादर पिटर अंकूश आदी पस्थित होते,

यात्रोत्सवाच्या यशस्वीतेसाठी स्नेहसदन चर्च प्रमुख विश्वस्त व यात्रोत्सव कमेटीचे उपाध्यक्ष अरुण लोखंडे, सेक्रेटरी संजय आढाव, खजिनदार रत्नाकर दोंदे, महीला मंडळ पँरिस कॉन्सिल, राहुरी ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले. यात्रेसाठी राहुरी शहर व तालुक्याच्या धर्मग्रामातून भक्त अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.