Breaking News

‘पांडुरंग कृपा’ने ओलांडला १ कोटी ठेवींचा टप्‍पा


वडगाव गुंड येथील पांडुरंग कृपा सहकारी पतसंस्‍थेने एक कोटी रुपयांच्‍या ठेवीचा टप्‍पा पार केला आहे. अशी माहिती संस्‍थेचे अध्‍यक्ष दत्‍तात्रय गुंड, उपाध्‍यक्ष चंद्रकांत लंके व व्‍यवस्‍थापक संतोष बनकर यांनी दिली आहे. गेली काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील जनतेचा आर्थिक वीकास होण्‍यासाठी व ग्रामीण भागातील विकासात्‍मक कामांना पाठबळ मिळण्‍यासाठी गावक-यांना या पतसंस्‍थेची स्‍थापना केली होती. गेली अनेक वर्षात गावक-यांच्‍या या प्रयत्‍नांना यश आले. सहकारी चळवळीच्‍या माध्‍यमातून ग्रामविकासासाठी मोठया प्रमाणात पाठबळ मिळाले आहे. निघोज व परिसरातील व्‍यावसायिक उद्योजक, छोटे व्‍यापारी यांना आर्थिक कर्ज उपलब्‍ध करण्‍यासाठी संस्‍था प्रयत्‍नशील असल्‍याची माहिती संस्‍थेच्‍या पदाधिका-यांनी दिली आहे.