रोजगार निर्मिती हेच मोठे आव्हान : सत्यजित तांबे
ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या कष्टातून आपल्या मुलांचे उच्च शिक्षण पूर्ण करतात. परंतु सरकारच्या उदासिनतेमुळे व थांबलेल्या विकासामुळे तरुणांना नोकर्या मिळत नाहीत. त्यामुळे नव्याने रोजगार निर्मिती हेच आपल्या सर्वांसमोरील मोठे आव्हान आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले आहे.
संगमनेर महाविद्यालय, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालय, अमृतवाहिनी महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांची भेट घेवून थेट कट्ट्यावरत्यांनी तरुणांशी संवाद साधला. यावेळी निखील पापडेजा, गौरव डोंगरे, विश्वास मिसाळ, हैदरअली सय्यद, श्रेयश कर्पे, संकेत गाडेकर, सुरज शिंदे, शेखर सोसे, ऋषिकेश घुले, अभिषेक कडू, शुभम ढूमणे, आशिष म्हस्के, आकाश घुले, संदेश कुटे, संकेत काळे, निखील पवार, वैष्णवी कापसे, नम्रता कवडे, ऐश्वर्या गुंजाळ, वर्षा ढोले, सुमित देशमुख, आकाश फटांगरे, सिद्देश गुंजाळ, अनिकेत तोखडी, तुषार पोटे, तेजेस केणेकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या माडंतांना सांगितले, की नव्या पिढीला शिक्षण घेवून नोकरी मिळत नाही. स्पर्धेमुळे विद्यार्थी मोठ्या चिकाटीने शिक्षण घेतात. मार्क्स पाडतात. पालकही मोठ्या काटकसरीने पैसे पुरवतात. परंतु विद्यार्थ्यांना शिक्षण घेवूनही नोकर्या न मिळाल्याने त्यांच्या वाट्याला मोठे नैराश्य येत आहे. उच्च शिक्षणामुळे समाजाच्या व कुटूंबाच्या आमच्याकडून खूप अपेक्षा वाढल्या आहेत. परंतु आम्हाला नोकरी ही लॉटरीप्रमाणे झाली आहे. याचवेळी सरकारच्या अनेक चुकीच्या धोरणांमुळे शिष्यवृत्ती रखडल्या आहेत. मुलींना सुरक्षितता महत्वाची आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटीची सोय नाही. तांबे यांनी कट्ट्याावर बसून विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकल्या.
विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना तांबे म्हणाले, की नाकरी हा सर्वांसाठी महत्वाचा विषय आहे. भारतात विशेषत: महाराष्ट्रात नवनवीन उद्योग येणे गरजेचे आहे. परंतु मागील ३ वर्षांपासून नवीन उद्योग येणे थांबले आहे. नवीन आयटीहबबरोबर नाशिक, पुणे, मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडोअर झाल्याने नव्याने रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. महाराष्ट्रात पायाभूत सुविधा व विकासामुळे नोकरीची संधी निर्माण होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वेळेत मिळणे याचबरोबर प्रशासकीय व महाविद्यालयीन अडचणी तातडीने सोडविण्यासाठी आपण पहिला आग्रह धरु, असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्याना दिला.
दादा! तुम्ही वारंवार या
विद्यार्थ्यांसमवेत महाविद्यालयाच्या प्रांगणात कट्टयावर सत्यजित तांबे यांनी मनमोकळा संवाद साधला. आपल्या समस्या सोडविण्यासाठी तरुणतरुणींना मोठा आधार मिळाल्याने युवक व युवतींनी ‘दादा तुम्ही वारंवार या’ असे कळकळीचे आवाहन केले. तुमच्या येण्याने मन हलके झाले, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
विद्यार्थी मंचच्यावतीने सर्वे सुरु
महाविद्यालयीन युवक व युवतींच्या समस्या सोडविण्यासाठी जयहिंद विद्यार्थी मंचच्यावतीने एक फॉर्म भरुन सर्व्हे केला जाणार आहे. यामध्ये युवकांसमोरील प्रमुख ३ आव्हाने, महाविद्यालयीन प्रमुख ३ समस्या व उपाय अशी माहिती संकलित करुन प्रश्न सोडविले जाणार आहेत. यावेळी सर्वपक्षीय विविध विद्यार्थी संघटनांनी विद्यार्थी संवाद कार्यक्रमात भाग घेतला. प्रत्येक ठिकाणी हजारो युवक व युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.