Breaking News

सुयोग्य पाणी व्यवस्थापन महत्वाचे : डॉ. इयान स्मॉट


राहुरी : जगाच्या तुलनेत आशिया खंडात सर्वात कमी पाणी साठे आहे. भारत देशात भूगर्भातील पाण्याचा सर्वात जास्त वापर होतो. दिवसेंदिवस पाण्याचे दुर्भिक्ष्य दुर्भीक्ष वाढत आहे. यासाठी सांडपाण्याचे पुर्नवापर, शेतीला सूक्ष्म सिंचनाची जोड, पाणी वाटपाच्या पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण, पाणी गळतीचे प्रमाण थांबविणे, पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन केलेतरच पाण्याची शाश्वती राहू शकते असे प्रतिपादन युनायटेड किंडम येथील लॉगबोरॉग विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. इयान स्मॉट यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. आण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि कृषि अभियांत्रिकी माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुवर्ण जयंती वर्षानिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.