Breaking News

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या ; पती, सासरा अटकेत

सासरच्या जाचाला कंटाळून मनिषा अनिल शिरोळे (३५) या विवाहितेने विष प्राशन केल्याने तिचे निधन झाले. या विवाहितेचा मृतदेह नातेवाईकांनी राहाता पोलीस ठाण्यात ठेवला. मयताचा पती व सासर्यास अंत्यविधीसाठी पाठवा. अन्यथा पोलीस ठाण्याच्या आवारातच मयतावर अंत्यसंस्कार करू, असा पवित्रा नातेवाईाकांनी घेतल्याने पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत पेच कायम होता. 


अखेर आत्महत्तेस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या मंडळीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर रात्री उशीरा हा पेच सुटला. यानंतर पोलीस बंदोबस्तात सदर विवाहितेचा मृतदेह वाळकी येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. दरम्यान, मयत मनिषाचे मामा सूर्यभान बाबुराव दिघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राहाता पोलीसांनी मनिषाता पती अनिल शिरोळे, सासरा साईनाथ बाळाजी शिरोळे, सासू सुशिलाबाई साईनाथ शिरोळे, दीर वाल्मिक साईनाथ शिरोळे यांच्याविरुध्द आत्महत्तेस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. यात पोलिसांनी पती व सासर्याला अटक केली आहे.