Breaking News

सोयाबीनपाठोपाठ मका काढणीसाठी हार्वेस्टरचा वापर

अहमदनगर, दि. 2, नोव्हेंबर - कोपरगाव तालुक्यात सुरुवातीला सोयाबीन आता त्यापाठोपाठ  मका पिकांची काढणीसाठी ज्यादा पैसे देऊनही  मजुर मिळत नसल्याने नाईलाजाने  हार्वेस्टर मशीनच्या साह्याने मका कापणीचे काम चालु आहे.यामुळे चारा भुईसपाट होऊन जमीनीचे धन होत आहे.
जनावरे सोयाबीनचे भुसकट आणि मकाचा चारा मोठ्या आवडीने खातात मात्र सध्या या मशिनमुळे चारा नामशेष होत आसुन येणार्‍या काळात पशुधन जगविण्याच्या काळजीने शेतक री चिंताग्रस्त आहे.
यावर्षी सोंगणीच्या भावातही वाढ झाली असुन सोयाबीनची तिन हजार तर आता मकाची पाच हजार रुपये एकरी असुनही मजुरांचे दुर्भिक्ष झाले आहे.मात्र रब्बीसाठी रान लवकर तयार  करण्याच्या उद्देशाने मशीनने सोंगणी करुन काही तासात शेत रिकामे होत आहे. मात्र त्याहुनही गंभीर प्रश्‍न हाच कि  हार्वेस्टरने काढणी करण्यास   रोख पैसे देणेसाठी सध्या एकमेक ांच्या डोक्यात टोप्या घालून पैशांची  उपलब्धता करावी लागत असुन महावितरणची थकबाकी भरण्याची अन्याथा विज तोडली जाण्याची टांगती तलवार डोक्यावर आहे.
गेल्या चार-पाच वर्षापासुन तालुक्यातील शेतकरी मोठया दुष्काळाशी सामना करत आहे. त्यातच यंदाच्या खरिपात पावसाने बर्‍यापैकी हजेरी लावल्याने शेतकर्‍यांनी मोठया प्रमाणात  मका पिकाची पेरणी केली होती.  उतारही चांगला झाला होता.
परंतु जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे मका पिकाच्या  फटका बसला व पावसाने महिनाभर नंतर चांगली हजेरी लावल्याने मका पिक जोमात आले त्यामुळे काढणीस देखील  उशीराच आली. तसेच सुरवातीस पेरणी झालेली मका काढनी करून जमीन तयार करून त्या जागी गावराण कांदा लागवडीची व उशीराची मका काढणीचे  कामे एकाच वेळी  आल्याने मका काढणीचे काम किचकट असल्याने व कांदा लागवडिचे काम सोपे असल्याने व चांगले पैसे मिळत असल्याने मजूरांची  धाव तिकडेच जास्त आहे तर दुसरीकडे क ाढणीस आलेल्या मकाचे मजुरांच्या भरवशावर डोळ्यांदेखत नुकसान होत असल्याने शेतकर्‍यांनी पररराज्यातुंन आलेल्या हारवेस्टर च्या सहायाने नंबर लाऊन काढनी करताना शेतक री दिसुन येत आहे.
एकंदरीतच सर्व परीस्थितीचा विचार करता शेतकरी सध्या  तिहेरी संकटात सापडला आहे .एकीकडे  हार्वेस्टरने काढणी केल्याने चारा तर मिळत नाही काहीअंशी धानाचीही नुकसान  होत आहे मात्र नाईलाजाने त्याकडे शेतकरी कानाडोळा करताना दिसत आहे.   मकाच्या क्षेत्रातील ओल निघुन गेली असल्याने  ज्वारीची पेरणी होणार  कि नाही याबाबद शंका  असली तरी येणार्‍या पुढील काळात पशुधनाच्या मक्याचा व ज्वारीच्या चार्‍याची  मोठया प्रमाणावर समस्या निर्माण होणार आहे असे दिसते तर तिसरीकडे रोख चलन उपलब्ध क रायचे कोठून अशा परिस्थितीत  सध्या कोपरगाव तालुक्यातील शेतकरी सापडला आहे.