निकृष्ट पोषण आहार बंद करण्याची मागणी
अहमदनगर, दि. 2, नोव्हेंबर - नेवासा बालकल्याण विभागामार्फत तालुक्यातील गरोदर महिला व बालकांना दिला जाणारा निकृष्ठ पोषक आहाराचा पुरवठा त्वरित बंद करावा अशा मागणीचे निवेदन भाजपा युवा मोर्चाच्या वतीने बालप्रकल्प अधिकारी सुनील अंकुश यांना देण्यात आले.
तालुक्यातील अंगणवाडीना महिला बाल कल्याण विभागामार्फत अंगणवाडी महिला शून्य ते सहा वर्षाच्या बालकासह गरोदर मातांना घर पोहच तीन महिन्याला घरी तयार करून खाण्यासाठी शिरा, उपमा व शेवयाची नऊ पिशव्या दिल्या जातात.
मात्र हा पूर्णपणे निकृष्ठ दर्जाचा असल्याने हा आहार तालुक्यातील कोणतीच महिला व बालके खात नाहीत. त्यामुळे हा आहार जनावरांना खाऊ घातला जातो.
या आहाराची बाहेरील पिशवी ही चांगल्या प्रतीची असून आतील आहार मात्र निकृष्ठ दर्जाचा आहे. शासन यावर लाखो रुपये खर्च करत आहे . आंधळं दळतंय अन कुत्र पीठ खातंय या उक्तीप्रमाणे महिला व बाल कल्याण विभागाचा कारभार चालू असल्याचा दिसत आहे. या आहाराचा दर्जा सुधारावा व हे वितरण करणार्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, तसेच त्याऐवजी गहू, तांदूळ, वाटाणा यापैकी एक तरी चालू करावे असे निवेदनात म्हटले आहे. गावोगावी आंगणवाडीमध्ये जाऊन या आहार विरोधात ठराव घेण्यात येणार आहे. या मध्ये सुधारणा नाही झाली? तर मोठे जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे निवेदनावर भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सतीश कर्डीले, सुभाष पवार, प्रताप चिंधे, प्रशांत बहिरट, भाऊराव नगरे, राजू शेख आदींच्या साह्य आहेत.