Breaking News

धार्मिकस्थळांच्या सर्व्हेवर नगरसेवकांचा अक्षेप !

अहमदनगर, दि. 01, नोव्हेंबर - शहरातील अनधिकृत व रस्त्याला अडथळा ठरणार्‍यां धार्मिकस्थळांवर कारवाईसाठी उच्च न्यायायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेली मुदत दि. 17 नोव्हेंबरला संपुष्टात येणार आहे. तसेच कारवाई काय केली याचाही लेखाजोखा न्यायालयात मांडायचा असल्याने आता महानगपालिकेत महापौर यांच्या अध्यक्षतेखाली उच्च न्यायालयात दाखल याचिका क्र.104/2010 मधील कार्यवाहीची माहिती व्हावी यासाठी बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत नगरसेवकांनी धार्मिकस्थळांच्या सर्व्हेवरच आक्षेप घेत पुन्हा लवकरात लवकर सर्व्हे करावा, अशी मागणी केली.  यावर आयुक्तांनी इतर माहिती असल्यास आपण पुन्हा ती आमच्याकडे सादर करावी, असे सांगीतले. 
आजच्या बैठकीत नगरसेकांनी अनेक प्रश्‍न विचारले. मात्र त्याचे समर्पक उत्तरे प्रशासनाला देता आले नाही. त्यातच पुरातन मंदिरांचा सर्व्हे कोणी केला असा प्रश्‍नही विचारण्यात आला. जर हेमांडपंथी मंदिरे हे 70 ते 80 वर्षापूर्वीची आहेत, तर त्यांचा सर्व्हे कसा कोणकोणत्या नियमाला धरुन केला. सर्व्हे करताना कोणते निकश लावले, पोलिस खात्याचा आणि वाहतूक शाखेचा काय अहवाल होता, सर्व्हे समिती करताना केलेला ठरावाची माहिती मिळावी असे एक न अनेक प्रश्‍न यावेळी विचारली गेले. मात्र  या प्रश्‍नांची समर्पक उत्तरे न मिळाल्याने नगरसेवक आक्रमक झाले. नगरसेवकांच्या प्रश्‍नांना  उत्तर देताना प्रशासनाची त्..त्, म्..म्.. झाली यातून प्रशासनाने केलेल्या सर्व्हेवर बैठकीमध्ये ताशेरे ओढण्यात आयुक्तांना धारेवर धरले गेले.
सध्याची होणारी कारवाई स्थगित ठेऊन लवकरात लवकर योग्य पध्दतीने सर्व्हे करावा अशी मागणी सचिन जाधव यांनी केली. याला बाळासाहेब बोराटे, अनिल शिंदे, दिलीप सातपुते यांनी होकार दर्शविला.
17  तारीख जवळ येत असताना प्रशासनाची चांगलीच धावपळ सुरु झाली आहे. न्यायालयापुढे अहवाल सादर करण्याची करसत मनपाला करावीच लागणार आहे. शहरातील धार्मिक स्थळांवर पहिल्या टप्प्यात कारवाई केली जाईल, असे सांगण्यात येत होते. मात्र आता कारवाईसाठी सर्वांची त्रेधातिरपीट उडाली आहे.