Breaking News

जि.प. लिपीकवर्गीय कर्मचार्‍यांचे प्रश्‍न सोडविणार - महेश झगडे

अहमदनगर, दि. 01, नोव्हेंबर - महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेने आज दिनांक 30/10/2017  रोजी जिल्हापरिषदेतील लिपीकगवीर्गीय कर्मचार्‍यांचे सुधारीत आकृतीबंध, खास बाब बदल्या, स्पर्धा परिक्षा, सेवा प्रवेशात्तर परिक्षा इत्यादी   श्री महेश झगडे आयुक्तं, नाशिक विभाग नाशिक यांची भेट घेतली. जिल्हापरिषद लिपीकवर्गीय कर्मचार्‍यांची सुधारीत आकृतीबंधात पदे कमी करण्याचा घाट शासनाने घातेलेला आहे. त्यासंदर्भात संघटनेमार्फत जिल्हापरिषदेमध्ये विभाग निहाय लिपीकवर्गीय कर्मचार्‍यांचे पदांची वाढ करणे आवश्यक असून सामान्य प्रशासन विभाग, शिक्षण विभाग, आरोग्यं विभाग, ग्रामपंचायत विभाग, पशसंवर्धन विभाग, बांधमाक, पाणी पुरवठा, लघुसिंचन इत्यादी विभागांमध्ये व पंचायत समिती स्तरं आणि पंचायत समिती मधील इतर कार्यालयामध्ये  कक्ष अधिकारी, कार्यालयीन अधिक्षक, वरिष्ठं सहा, कनिष्ठं सहा इत्यादी पदांची  का आवश्यकता आहे आणि कशा पदध्दतीने पदे वाढविली पाहिजे याबाबत आयुक्त साहेबांसमोर लिपीक शिरोमाणे मुख्यसचिव  मा बापूसाहेब कुलकर्णी  यांनी प्रस्ताव सादर केला.
याबाबत  आयुक्त यांनी सदर प्रस्तावानुसार  आणि शासनाचे झिरो पेंडंसी इत्यादी महत्वाच्या योजना जर जिल्हा परिषदेमध्ये राबवायच्या असतील तर जिल्हापरिषदेत लिपीकवर्गीय कर्मचार्‍यांची पदे वाढविली पाहिजे. याबाबत प्रस्ताव सादर करण्याबाबत मागणी लिपीकवर्गीय संघटनेचे राज्यंसचिव श्री अरुण जोर्वेकर, विभागीय अध्यक्ष  अशोक कदम, माजी जिल्हाध्यक्ष मोहम कडलग आदींनी केली.
यावर आयुक्त यांनी जिल्हा परिषदेमध्ये खरोखर लिपीकांची पदे कमी असून शासनाकडे लिपीकांची पदे वाढविणेबाबत प्रस्ताव सादर करु असे आश्‍वासन दिले. तसेच लिपीकवर्गीय कर्मचार्‍यांचे खास बाब बदल्या व स्पर्धापरिक्षा आणि सेवाप्रवेशोत्तर परिक्षा इत्यादी प्रश्‍नं सोडविणेबाबत आयुक्त यांनी आवश्‍वासन दिले.
लिपीकगर्वीय कर्मचा-यांची पदे वाढविणेबाबत व इतर प्रश्‍नं सोडविणार असल्याने संघटनेचे वतीने सांगण्यात आले.