देशाच्या समृद्धीसाठी शेती समृद्ध करणे गरजेचे - डॉ. मुळीक
पुणे, दि. 20, नोव्हेंबर - शेती समृद्ध व महिला सुरक्षित असतील तर देश समृद्ध व सुखी होईल. अर्थात त्यासाठी पर्यावरण पूरक गाव, कचरा निमूर्लन, शुद्ध पाणी व्यवस्था, महिला सुरक्षा, दारूबंदी व अद्ययावत शिक्षण पद्धतीचा वापर ज्या खेड्यात होतो, तेच गाव आणि तीच ग्रामपंचायत ख-या अर्थाने आदर्श व परिपूर्ण असे संबोधिले जाऊ शकते. त्याच दृष्टीने सरपंचांना विकासकार्य करावयाचे आहे’, असे मत ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी व्यक्त केले.
डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे व जिल्हा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवनिर्वाचित सरपंच परिषद 2017 (ग्रामीण तादात्म्य क ार्यक्रमाचे) च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या परिषदेला 100 पेक्षा अधिक सरपंच उपस्थित होते.
डॉ. मुळीक म्हणाले की, ’जनतेची नेत्याकडून खूप अपेक्षा असते. त्यामुळे सरपंचाने भरपूर काम करून, प्रत्येक सरकारी योजनांचे चांगल्या मार्गाने पैसे मिळवून त्याचा वापर गाव विकासासाठी करावा. ग्रामपंचायतीत ड्रोनचा वापर वाढवावा. त्यामुळे सरपंचाला गावाची व शेतीची खरी स्थिती समजण्यास वेळ लागणार नाही. शेतक-यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला हवा असेल तर गावातील दूध, भाजी आणि कचर्यासारख्या गोष्टी गावातच ठेवा. शहराला याचे मोल कळाले की शेतमालाला योग्य मोबादला आपोआपच मिळेल. आधी शेतकरी असतो व मग व्यापारी असतो ही गोष्ट लक्षात ठेवावी. शेतक-याला आर्थिकदृष्टया समृद्ध होण्यासाठी शेतीपूरक व्यवसायसुद्धा करायला हवेत.’