चार हजार कर्जमाफी अर्ज रद्द
सोलापूर, दि. 20, नोव्हेंबर - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत (कर्जमाफी) जिल्ह्यातील हजार 938 अर्ज नामंजूर झाले. 72 जणांनी स्वत:हून पुढे आले. म्हणाले, ’चुकून अर्ज भरला... लाभ मिळाला तरी नको.’ सहकार खात्याचे जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी ही माहिती दिली. कर्जमाफी याद्यांमध्ये सातत्याने घोळ होत असल्याने सर्व अर्जांची नव्याने छाननी झाली.
त्यात ही आकडेवारी पुढे आली. यातील बहुतांश अधिकारी आणि पदाधिकारी आहेत. कुणी शिक्षक आहे, तर कुणी जिल्हा प रिषदेतील अधिकारी कर्मचारी आहे. कर्जमाफीच्या निकषांत बसत नसतानाही त्यांनी अर्ज भरले होते. त्यांचे अर्ज निकाली काढण्याच्या अवधीत त्यातील 72 जण स्वत:हून हजर झाले. त्यांनी चुकून अर्ज भरल्याचा निर्वाळा दिला. त्यांचेही अर्ज निकाली काढल्याचे देशमुख म्हणाले. शासकीय अधिकारी, कर्मचारी, लाभाचे पद असलेल्यांना कर्जमाफी नाही, हे योजनेत स्पष्टपणे म्हटले होते.
तरीही जिल्ह्यातून लाख 22 हजार अर्ज ऑनलाइनवर आले. 73 लेखापरीक्षकांनी त्यांची छाननी केली होती. तरीही त्यात त्रुटी आढळून आल्या. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे आलेल्या याद्यांमध्ये निकषात बसत नसतानाही संबंधितांना मंजुरी मिळाली होती. हा आयटीचा घोळ असल्याचे सांगत शासनाने सारवासारव केली होती. त्यानंतर नव्याने छाननी झाली.
