सासवड येथे हातातील पिशवी हिसकावून 5 लाख लंपास
पुणे, दि. 20, नोव्हेंबर - रस्त्याने चालत जाणार्या एका व्यक्तीच्या हातातील पिशवी हिसकावून चोरांनी 5 लाख रुपये लंपास केल्याची घटना सासवडमध्ये घडली आहे. सुनिल लक्ष्मण कावडे (वय 46) असे त्या चोरांनी लुटलल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी 2 अज्ञात व्यक्तींविरोधात सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील कावडे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी त्यांचे चुलत बंधू कैलास कावडे यांच्याकडून ते 5 लाख रुपये घेणार होते. कैलास कावडे यांनी ते पैसे ज्ञानदीप को.ऑप. बँकेतून कर्जाने घेतले होते. सुनील कावडे हे तीच रक्कम घेऊन घरी परतायला निघाले. त्यावेळी त्यांनी ते 5 लाख रुपये त्यांच्याकडे असलेल्या एका कापडी पिशवीमध्ये ठेवले होते आणि ती पिशवी लग्न पत्रिका असलेल्या पिशवीमध्ये ठेवली. त्यानंतर ते ती रक्कम घेऊन थेट घरी न जाता काही नातेवाईकाना लग्न पत्रिका वाटण्यास गेले. त्यानंतर ते त्यांचे बँकेतील काही काम आटोपून दुपारी 2 च्या सुमारास घरी निघाले.