Breaking News

अपंग - दिव्यांग व्यक्तींनी विवाह केलेल्या जोडप्यांचा सत्कार

सांगली, दि. 16, नोव्हेंबर - समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सांगली या विभागाअंतर्गत अपंग - अव्यंग (दिव्यांग) व्यक्तीनी विवाह केलेल्या जोडप्यांचा सत्कार समारंभ व बचत प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम जिल्हा परिषद समाज कल्याण समिती सभापती ब्रम्हदेव पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली वसंतदादा पाटील जिल्हा परिषद सांगली सभागृहात संपन्न झाला.


या कार्यक्रम प्रसंगी समाज कल्याण समिती सभापती ब्रम्हदेव पडळकर यांनी पुढील सहा महिन्यांच्वधीत लाभार्थ्यांची संख्या 100 जोडप्यांच्या वर जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली व ही योजना जास्तीत जास्त दिव्यांग समुदायापर्यंत पोहचावी यासाठी कार्यालयाच्या वतीने जास्तीत जास्त प्रयत्न केला जाईल असे आश्‍वासन दिले. शिक्षण व क्रीडा सभापती तमन्नगा ैंडा रविपाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने व ड. शांता कनुंजे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा अपंग संघटनेचे पदाधिकारी खलिफा, शारदा भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. काही दिव्यांग जोडप्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या व या योजनेचा लाभ घेतल्यामुळे मनोबल निश्‍चित वाढले आहे असे सांगितले.
यावेळी 25 हजार रूपयांचे बचत प्रमाणपत्र धनादेशाच्या स्वरूपात, 20 हजार रूपये व संसार उपयोगी साहित्यासाठी 4 हजार 500 रूपये मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग जोडप्यांना प्रदान करण्यात आले. प्रास्ताविकात जिल्हा परिषद जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी योजनेची माहिती व उद्देश लाभार्थ्यांना सांगितला. पुढील काळात जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.