नेहरू युवा केंद्रामार्फत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
सांगली, दि. 16, नोव्हेंबर - नेहरू युवा केंद्र सांगलीच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तालुक्यात 18 ते 29 वयोगटातील युवा, युवतींसाठी तालुकास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धा आयो जित करण्यात येणार आहेत. या स्पर्धेत जास्तीत जास्त युवक, युवतींनी आपला सहभाग दिनांक 18 नोव्हेंबरपर्यंत नोंदवावा, असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक प्रमोद हिंगे यांनी केले आहे.
या स्पर्धेतून निवड होणारे विजेते जिल्हा स्तरावरील स्पर्धेत तर जिल्हास्तरीय विजेते राज्यस्तर्धेत व राज्यस्तरीय विजेते राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेण्यास पात्र ठरणार आहेत. या स्पर्धेत हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये विषय मांडावा लागणार असून स्पर्धेसाठी देशभक्त युवा एंव राष्ट्रनिर्माण हा विषय ठेवण्यात आला आहे.

तालुकास्तरावरील विजेत्यांना गौरवपत्र, जिल्हास्तरीय विजेत्यांना अनुक्रमे रोख 5 हजार, 2 हजार, 1 हजार रूपये व गौरवपत्र, राज्यस्तरावर अनुक्रमे रोख 25 हजार, 10 हजार व 5 हजार रूपये व गौरवपत्र तर राष्ट्रीय स्तरावर अनुक्रमे रोख 2 लाख, 1 लाख व 50 हजार रूपये व गौरवपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी व अधिक माहितीसाठी नेहरू युवा केंद्र सांगली दूरध्वनी क्रमांक 0233-2325034 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.