Breaking News

नवी मुंबईत ऑनलाईन वेश्या व्यवसायाचे रॅकेट उद्ध्वस्त

नवी मुंबई, दि. 30, नोव्हेंबर - ऑनलाईन वेश्या व्यवसायाचे रॅकेट नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलीसांनी मोठ्या शिताफीने तपास लावून उध्वस्त केले. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन कौसाडीकर यांना ऑनलाईन वेश्या व्यवसाय नवी मुंबईत होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी बनावट ग्राहक तयार करून जा हिरातीतील मोबाईलवर फोन केला. 



त्यावर सदर आरोपींपैकी चौधरी याने या ग्राहकाला नेरूळ येथील डी.वाय.पाटील महाविद्यालयाजवळील रिक्षा स्टँड जवळ बोलावले. पोलीसांनी अगोदरच सदर ठिकाणी सापळा लावून ठेवला होता. तेथे त्या ग्राहकाला वेश्या पुरवून त्याच्याकडून 2 हजार रुपये घेतले. पोलीसांनी या ठिकाणी छापा टाकून चौधरी याला रंगेहात अटक केली. तसेच वेश्यागमनासाठी पुरविण्यात आलेल्या तीन पिडीत महिलांची सुटका केली. 

त्यानंतर त्याच्या अन्य साथिदारांनाही अटक केली. पोलीस उपायुक्त तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिता भोर, पोलीस उपनिरीक्षक संजय क्षिरसागर यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणात दुर्गेशकुमार चौधरी (21), अनिल कुमार शहा (23), रितेश पासवान (21), अनिकेत पाडे (20) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.