Breaking News

राज ठाकरेंचं एक मत मात्र कमी झालं !


देशात व्यक्ती स्वातंत्र्य आहे, बोलण्याचा अधिकार सर्वांना आहे.पण राज ठाकरेंचं काही नुकसान झालं नाही. मात्र त्याचं एक मत मात्र कमी झालं, असा टोला अभिनेते नाना पाटेकर यांनी लगावला. फेरीवाल्यांसाठी एक जागा निश्चित करावी, जर अनधिकृतरित्या फेरीवाले बसले असेल तर त्यांना हुसकावून लावा असंही नाना पाटेकर म्हणाले.आज पुण्यात एनडीएची पासिंग आऊट परेड पार पडली. परेडनंतर नानांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
मनसेच्या फेरीवाल्या आंदोलनावर आक्षेप घेत नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांची बाजू घेतल्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्यात चांगलीच तूतू-मैंमैं झाली. ठाण्यात झालेल्या सभेत राज ठाकरे यांना नाना पाटेकर यांना फटकारलं होतं. मराठी सिनेमावर जेव्हा बंदी घातले जाते तेव्हा नाना का बोलत नाही असा प्रतिसवाल राज ठाकरे यांनी विचारला होता.