Breaking News

नितीन आगेला न्याय द्या


राहुरी प्रतिनिधी - जामखेड तालुक्यातील खर्डा येथील नितीन आगे याला न्याय मिळावा, या मागणीसाठी आर पी आयच्यावतीने राहुरी येथे तहसिलदार अनिल दौंडे व पोलिस निरिक्षक प्रमोद वाघ यांना निवेदन देण्यात आले. जामखेड तालुक्यातील खर्डा गावात नितिन आगे या बारावीच्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील सर्वच आरोपी निर्दोष मुक्त करण्यात आले.

 याप्रकरणी साक्षीदारांनी साक्ष फिरवल्याने साक्षीदार फितुर झाले की, त्यांच्यावर कोणाचा दबाव आला ? तसेच तपासी अधिकारी यांनी त्यांच्या कामात हलगर्जीपणा केला आहे का ? या सर्वच बाबींची चौकशी करण्यात येवुन नितीन आगे व त्याच्या कुटूंबास न्याय मिळवून द्यावा, आगे हत्याकांडाची सीबीआयमार्फत या संपूर्ण घटनेची चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन राहरी तालुका आर पी आयच्यावतीने देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्रावण वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष पापाभाई बिवाल, तालुका युवाअध्यक्ष सचिन साळवे, उपाध्यक्ष निलेश जगधने, बाबासाहेब शेलार, तानसेन बिवाल, सविता साळवे, बाबासाहेब साठे, बाळासाहेब मकासरे, राजेंद्र जगधने, गुलशन बिवाल, किशोर वैराळ, सनी जगधने आदी उपस्थित होते.