विक्रांत बगाडे सांगली जिल्हा परिषदेचे नवे ऍडिशनल सीईओ
सांगली, दि. 04, नोव्हेंबर - सांगली जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विक्रांत बगाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विक्रांत बगाडे सध्या जळगाव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. आर. बागल यांची शिराळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून बदली झाली आहे.
राज्यातील ग्रामीण विकास विभागाकडील 49 अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात या दोघा अधिकार्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील दि. 17 एप्रिल 2017 रोजी रजेवर गेले होते. तेव्हापासून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अजयकुमार माने यांच्याकडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार आहे. गेली सहा महिने हे पद प्रभारी आहे.
आता विक्रांत बगाडे यांची अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे. येत्या आठवडाभरात ते रूजू होणार असल्याचे सांगण्यात आले. विक्रांत बगाडे यांनी जानेवारी 2014 ते डिसेंबर 2015 या कालावधीत सांगली जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) या पदावर काम केलेले आहे.