Breaking News

राजपत्रित अधिकारी संघटनेतर्फे काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन

औरंगाबाद, दि. 04, नोव्हेंबर - चाळीसगाव गटविकास अधिकारी मधुकर वाघ आणि यवतमाळ येथील माध्यमिकचे गटशिक्षण अधिकारी वंजारी यांच्यावर झालेल्या शाईफेक हल्ला केल्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेतर्फे काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन करण्यात आले. व्यथित झालेले मधुकर वाघ यांनी पदाधिका-यांच्या जाचास कंटाळून आत्महत्या केली आहे. आज झालेल्या आंदोलनावेळी प्रकल्प संचालक वासुदेव सांळुंके, उपमुख्य प्रशासकीय अधिकारी मंजुषा कापसे, गटविकासअधिकारी हरकाळे, शिक्षण अधिकारी वाणी यांच्यासह सहायक गटविकास आधिकारी, गटविस्तार अधिकारी, ग्रामसेवक आदी.